सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर याने नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत चक्क 10 किलोमीटर अंतर अवघ्या 1 तास 4 मिनिटांत पार केले.

ही त्याची 48 वी मॅरेथॉन स्पर्धा होती. विशेष म्हणजे हे अंतर पार करणारा कबीर सर्वात छोटा धावपटू होता. त्याने ओपन कॅटेगरी मध्ये भाग घेतले होते त्यामध्ये 1468 धावकांपैकी कबीरने 227 व्या स्थानी रेस पूर्ण केली. उपस्थित सर्व व आयोजकांकडून कबीरचे खूप कौतुक करण्यात आले. लवकरच कबीर आपली सुवर्णमहोत्सवी धाव पुर्ण करणार असून असे करणारा तो सर्वात छोटा धावपटू ठरणार आहे.


