मुंबई : रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि माधवन जबरदस्त लाइमलाइटमध्ये आहेत. या स्टार्सचा ‘धुरंधर’ चित्रपट तिकीट बारीवर तुफान हिट ठरलाय. चित्रपटाची गाणी आणि सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धुरंधरला प्रेक्षकांचा मजबूत रिस्पॉन्स मिळतोय. म्हणूनच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हापासून 6 दिवसात जगभरात या चित्रपटाने 274.25 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.

बहरीन, कुवैत, ओमान, कतर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) या 6 देशांमध्ये धुरंधर चित्रपटावर बंदी आहे. बॉलिवूड हंगामानुसार या देशांमध्ये ‘धुरंधर’वर बॅन आहे. धुरंधरच्या टीमने आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. पण या देशात ही फिल्म रिलीज होऊ शकली नाही.




