सावंतवाडी : आज दिनांक 11/12/2025 रोजी 12.30 वा. चे मानाने मौजे सबनीस वाडा तोरणेपानंद येथे ता. सावंतवाडी येथे बेंजामी जॉनी फेराव (वय-47 वर्ष, राहणार सबनीसवाडा, जिमखाना मैदानाच्या समोर सावंतवाडी) याचे ताब्यात 24,000/ रुपये किमतीचे बियर व रमच्या 140 बाटल्या व टिन मिळून आले म्हणून त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस पोलिस हवालदार अनिल धुरी व महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.


