– भूषण आरोसकर.
सावंतवाडी : राज्य विज्ञान मंडळ, रवी नगर, नागपूर यांच्या उपक्रमांतर्गत 53 वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 हे दर्शन विद्या एज्युकेशन ,मुंबई ,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती ,सावंतवाडी व तालुकास्तरीय सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 डिसेंबर व गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी संस्कार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल निरवडे येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनात विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग गटातून कुमार युवराज संदीप धुरी इयत्ता आठवी याने रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रतिकृतीचे सादरीकरण केले व प्रथम क्रमांक पटकावला.
कुमार युवराज धुरी व मार्गदर्शक श्रीमती एस.यू.बांदेलकर यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही. भुरे, पर्यवेक्षक श्री एस.एस.वराडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्फत अभिनंदन व पुढील जिल्हास्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



