Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

अभिनंदनीय! – इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी पांडुरंग काकतकर यांची निवड.

सावंतवाडी: विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगढ येथे आयोजित देशातील सर्वात मोठ्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांची निवड झाली असून 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत त्याना देशविदेशातील शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ,अभ्यासक्रमाचे धोरणकर्ते, देशातील आय.आय.टी.चे प्रमुख, सायन्स सेंटर्सचे प्रमुख यांच्यासमवेत चर्चासत्रात सहभागी होऊन विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली.

सदर कार्यक्रमात नऊ प्रकारचे थिमॅटिक इव्हेंट्स होते त्यातील *एस्पायरिंग एज्युकेटर्स अँड टीचर्स गुरुकुला* या इव्हेंटसाठी संपूर्ण देशभरातून नोंदणीकृत हजारो शिक्षकांमधून निकषपात्र शंभर शिक्षक निवडले त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून तीन तर कोकण विभागातून एकमेव यांची निवड झाली.
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पृथ्वी विज्ञान मंत्रालय, विज्ञान भारती,इस्रो यांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमासाठी पंचकुला येथे दहा एकरहून अधिक जागेत सायन्स व्हिलेजची निर्मिती करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह,हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, उद्योग आणि पर्यावरण, तसेच वन आणि वन्यजीव मंत्री राव नरबीर सिंह यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमात चाळीसहून अधिक देशातील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ, उद्योजक तसेच विज्ञान क्षेत्रात कार्यरत हजारो इनोव्हेटर्स यांनी विविध विषयांवर विचार मांडले.यात विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयचे वैज्ञानिक सल्लागार अजय सूद, निती आयोग सदस्य तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कुलपती डॉ. व्ही.के.सारस्वत, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम रविचंद्रन, डी.एस.आय.आर. आणि डी.जी.,सी.एस.आय.आर.च्या सचिव डॉ.एन.कलायसेल्वी, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अभय करंदीकर, जैवतंत्रज्ञान विभागाचे डॉ राजेश गोखले, इस्रोचे अध्यक्ष व्हि. नारायणन, डी.ए.इ.अध्यक्ष डॉ अजित मोहंती, आय.सी.ए. आर.चे सचिव मांगीलाल जाट, डी.आर.डी.ओ. अध्यक्ष समीर कामत,आय ए.एस. हरियाणा मुख्य सचिव अनुराग रस्तोगी,विज्ञान भारती अध्यक्ष डॉ.शेखर मांडे, विज्ञान भारती सचिव विवेकानंद पै, राष्ट्रीय सचिव डॉ शिवकुमार शर्मा, सचिव डॉ अरविंद रानडे, पंजाब विद्यापीठ कुलपती रेणू वीग यांनी मार्गदर्शन केले.
काकतकर हे गेली अठ्ठावीस वर्षे ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून आजतागायत त्यांनी विज्ञान विषयाच्या अध्यापनात पूरक असे ई लर्निंग,मिनी सायन्स सेंटर,सायन्स फेअर,अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान नाट्य महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, सायन्स ऑन व्हील,करियर गाईडन्स ,व्हर्च्युअल रिॲलिटी असे अनेक उपक्रम घेतले आहेत. जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांची प्रत्यक्ष हाताळणी करता यावी यासाठी सायन्स ऑन व्हील उपक्रम राबविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे ते अध्यक्ष असून राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर,शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व शैक्षणिक संस्था व विज्ञान मंडळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन, विज्ञान नाट्य महोत्सव आणि राज्यस्तरीय विज्ञान मेळावा असे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा सिद्ध करणारे उपक्रम यशस्वीपणे आयोजन करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.आजतागायत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रमांसाठी त्यांची निवड झालेली असून आय.आय.टी, गुवाहाटी, येथील सायन्स सफारी,नॅशनल सायन्स काँग्रेस,कोलकाता,आय.आय.एस.एफ. इन्स्पायरिंग टीचर, फरीदाबाद, हरियाणा,एन.सी.ई.आर. टी.रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन,भोपाळ इ कंटेंट निर्मिती, सायन्स रायटिंग आयसर, त्रिवेंद्रम,अगस्त्या फाउंडेशन कुप्पम,आंध्र प्रदेश, सी.सी.आर.टी. हैदराबाद,दिल्ली,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,आयसर, यशदा,पुणे, स्टेम लर्निंग, मुंबई अशा अनेक नामवंत संस्थांचा त्यात समावेश आहे.जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या आदर्शवत कार्याची दखल आजतागायत अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी घेतली असून २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पांडुरंग काकतकर यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करून आपल्या सोनुर्ली विद्यालयासह जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याबद्दल राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूरचे संचालक राजकुमार अवसरे, कोल्हापूर विभागीय संचालक कार्यालयाचे विज्ञान पर्यवेक्षक समरजीत पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे,गट शिक्षणाधिकारी सविता परब,देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्लीचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, शालेय समिती अध्यक्षा आनंदी गावकर, सदस्य, प्रभारी मुख्याध्यापक अरुण तेरसे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles