सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, माजी मंत्री दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या शिफारशीनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी जिल्हा प्रमुखपदी सुदन कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात ओबीसी, भटक्या-विमुक्त जमातींच्या प्रश्नांना अधिक प्रभावी वाचा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांची सर्वसामान्य जनतेप्रती असलेली न्याय्य भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुदन कवठणकर पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


