सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात कोकणातील दशावतार या ग्रंथाचे लेखक स्व. प्रा. उदय खानोलकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून नवोदित दशावतार कलाकारांसाठी ज्येष्ठ दशावतार कलाकारांकडून दशावतार कलेविषयी मोलिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री महेश खानोलकर यांच्या अध्यक्षते खाली मान्यवरांचे गुलाब पुष्प व स्वागत कार्ड देवून स्वागत करण्यात आले.
मानव्यवरांच्या उपस्थितीत स्व. प्रा. उदय खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महाभारतातील उत्तरा-अभिमन्य व वृंदा-जालंधर हे नाटय प्रवेश मळगाव सुपुत्र सुप्रसिध्द दशावतार कलावंत नारायण आसयेकर ज्येष्ठ दशावतार कलावंत संतोष रेडकर व महेश धुरी यांनी सादर केले यावेळी नारायण आसयेकर यांनी अभिमन्यू आणि विष्णू या भूमिका सादर केल्या. संतोष रेडकर यानी जालंधर तर महेश धुरी यानी उत्तरा आणि वृंदा या स्त्रीभूमिका सादर करून समस्त रसिक प्रेक्षाकांना मंत्रमुग्ध केले.
या नाटय प्रवेश करून सादरीकरणासाठी वाहव्वा मिळविली प्रभाकर दळवी यांनी हार्मोनियम वादन, निलेश मांजरेकर यांनी तबलावादन तसेच समिर मांजरेकर यांनी झांज वादन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मळगांव सुपुत्र डॉ. एम. के उर्फे (आबा) गावकर उपस्थित होते त्यांनी स्व. प्रा. उदय खानोलकर यांच्या आठवणीना उजाळा दिला.
कार्यक्रमाला ग्रंथालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे तसेच बाळकृष्ण मुळीक, महेश पंत, देवण सर, रामकृष्ण परब, गुरुनाथ गांवकर, ग्रंथपाल आनंद देवळी, कर्मचारी वर्ग तसेच पंचक्रोशीतील दशावतार प्रेमी, वाचनप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन, प्रास्ताविक तसेच आभार कार्यवाह सौ. स्नेहा खानोलकर यांनी


