Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

खळबळजनक!, बांगलादेशी नागरिकांनी शेवगावातून काढले बनावट पासपोर्ट!, ४ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल! ; जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची कारवाई!

✍️ अविनाश देशमुख.

अहिल्यानगर : चार बांगलादेशी नागरिकांनी शेवगावातून बनावट पासपोर्ट काढले असून याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 21/11/2025 रोजी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे यांचेकडील अन्वये चार संशयीत बांगलादेशी नागरीक यांनी बनावट नावे, पत्ता व कागदपत्रे दर्शवत भारतीय पासपोर्ट मिळविला असून याबाबत अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सखोल चौकशी करावी, याबाबतचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे यांचेकडील पत्र प्राप्त झाल्याने अहिल्यानगर पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग शेवगाव यांना जिवीशा/पासपोर्ट चौकशी/ अहिल्यानगर दिनांक 26/11/2025 अन्वये चौकशी करण्याचे आदेशित केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, विभाग शेवगाव यांनी सदर चार संशयित बांगलादेशी नागरिक शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिदधार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी, प्रकाश सुनील चौधरी यांनी चुकीचे पदधतीने भारतीय पासपोर्ट मिळविला आहे. अगर कसे?, याबाबत चोकशी केली. त्यांचे चौकशी दरम्यान असे निष्पण्ण झाले की, वर नमुद चार संशयित बांगलादेशी नागरिक यांचा भारतीय नागरीक असल्या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा साक्षीदार यांचेकडे केलेल्या चौकशीत आढळून आला नाही. सदर इसम यांनी भारतीय नागरिक असल्याबाबत बनावट पत्ता व कागदपत्रे सन 2018 मध्ये शासकीय कार्यालयात सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविला आहे. अशा आशयाचा चौकशी अहवाल जा.क्र शेवि/आर/पासपोर्ट चौकशी/शेवगाव दिनांक 02/12/2025 अन्वये पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर यांना सादर केलेला आहे. सदर चौकशी अहवालाचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर यांनी त्यांचेकडील क्रमांक जि.वि.शा./पासपोर्ट – गुन्हा/ अहिल्यानगर अन्वये सदर चार बांगलादेशी इसमांविरुदध गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे.
इसम नामे शुओ कोनक मुस्तुडी (Passport No-S0437573), राजू सिदधार्थ चौधरी (Passport No-S0436971), जेलो प्रियतोश चौधरी (Passport No-S0456498), प्रकाश सुनिल चौधरी (Passport No-S1710723) या भामट्यानी सन 2018 मध्ये शासकिय कार्यालयात भारतीय नागरीक असल्याचा बनावट पत्ता व कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवुन शासकीय कार्यालयाची फसवणुक केली आहे. म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव विभाग यांच्या सूचना व आदेशानुसार शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शना खाली शेवगाव पोलीस स्टेशनचे गोपनिय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष हरिभाऊ वाघ यांनी वरील नमुद चार इसमांविरुदध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420, 465, 468, 471 सह भारतीय पासपोर्ट अधिनिमय 1967 चे कलम 12 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, शेवगांव शहरासह तालुक्यात पर राज्यातून व्यवसाया निमित्त अनेक नागरिक बेकायदेशीर रित्या भाड्याने खोल्या घेऊन राहतात. मागे एकदा अशाच भामट्या लोकांनी स्थनिक व्यापाऱ्यावर गोळीबार केला होता. आतातरी स्थानिक पोलीस अश्या संशयास्पद लोकांची कसून चौकशी करणार कि नाही?, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles