मुकुंदराव चिटणीस, सावंतवाडी ( माठेवाडा) शहरातील एक जुने जाणते शतायुषी व्यक्तिमत्व!!
४ ऑक्टोबर २०२३ रोजी शतक पूर्ण आणि १०१ व्या वर्षात पदार्पण! सध्या मुक्काम पुणे !

सर्वश्री मुकुंदराव, बापू लुकतुके, गंगाधर शिवेश्र्वरकर आणि अक्षरमहर्षी गोवेकर हे चौघेजण फार पूर्वी शहरात सायं फेरी घालून बापूसाहेब यांच्या पुतळ्या पाशी गप्पा मारत बसलेले असायचे.
मुकुंदराव हे रसिक, उत्तम वाचक होते. जुनी अनेक पुस्तके, मासिके याचा प्रचंड संग्रह त्यांचेकडे होता. विनोदाची अतिशय उत्तम जाण असलेले, संस्थान कालीन अनेक आठवणींचा खजिना असलेले, सदा हसतमुख असे हे व्यक्तिमत्व सुंदर नगरीचे भूषण आहे!! शहरातील केशवसुत कट्ट्यवरील अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. आजही वृत्तपत्र वाचन सुरू असून सावंतवाडी बाबत काही बातमी दिसल्यास ते फोनवर संवाद साधतात हे विशेष!!
त्यांचे उर्वरित नियत आयुष्य निरामय सुखद जावो ही प्रार्थना!!
🌹🌹🎂🎂🌹🌹
-✍️ डॉ. मधुकर घारपुरे.,
सावंतवाडी- सिंधुदुर्ग.


