Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? ; ‘ही’ ६ नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या!

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात न्यायलयाने 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी मोबाईलवर रमी खेळतानाचा वाद आणि आता सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरले, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये सतत वाढ होतानाच दिसत आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल असले तरी त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने जी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती ती सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर आता कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात होते, त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला. कोकाटे याचं खातं काढून घेतल्यानंतर सध्या ते अजित पवार यांच्याकडे आहे, तर कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची निवड कधी होणार, ते खातं कोणाल मिळणार असे अनेक सवाल उपस्थित होत असून याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे.

क्रीडा खातं कोणाकडे?, कधी होणार निर्णय?

माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

त्यामुळे आता अजित पवार हे माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला मंत्रीपदासाठी त्यांची पसंती असेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकटेंच्या जागी जर मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार केला तर प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके या तीन नावांचा सुद्धा विचार होऊ शकतो.

 धनंजय मुंडेच्या नावाने उंचावल्या भुवया –

धनंजय देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, तो धनंजय मुंडे यांच्या निकटचा सहकारी आहे. गेल्या वर्षी झालेल्या या हत्याप्रकरणानंतर मोठा गदारोळ झाला, अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या हत्याप्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नाही, मात्र तरीही धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल का? कोकाटे यांच्या जागी त्यांना हे मंत्रीपद देण्यात येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर माजी मंत्र्यांसह धनंजय मुंडे यांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles