Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

खळबळजनक! – माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह! ; अपघाती मृत्यू की घातपात?

नाशिक : ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी (वय 52) यांचा संशयास्पद मृतदेह पळसे–शिंदे परिसरात एका नाल्यात आढळून आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते बेपत्ता होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे. कैलास चौधरी हे 11 डिसेंबर रोजी सकाळी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना विचारपूस केली. तरीही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

नाल्यात आढळला मृतदेह –

दरम्यान, गुरुवारी (दि. 18) सकाळी पळसे गावाजवळील एका पुलाखाली नाल्यात मृतदेह आढळून आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर प्राथमिक तपासात हा मृतदेह बेपत्ता असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह आढळून आल्याची बातमी समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अपघाती मृत्यू की घातपात?

या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हा अपघाती मृत्यू आहे की घातपात, याचा सखोल तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles