सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे परमपूज्य लोकनाथ महाराज यांचे अमेरिकन संन्याशी शिष्य परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांनी नवनिर्वाचित सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे अभिनंदन केले. दरम्यान, सावंतवाडी शहर आध्यात्मिक आणि भक्तिमय करण्यासाठी चैतन्य महाराज यांनी नूतन नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांना दिल्या आहेत. यावेळी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले यांच्यासह सावंतवाडी इस्कॉन परिवाराचे सदस्य उपस्थित होते.


