Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

व्यसनमुक्तीवर चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे वैभववाडीत आयोजन.

व्यसनमुक्तीवर चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी : नशाबंदी मंडळाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि व्यसनमुक्ती सप्ताह २ आक्टोबर ते ८ आक्टोबर २०२४ साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने वैभववाडी तालुकास्तरीय समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग, पोलीस ठाणे वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी यांच्या सहकार्याने नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत व्यसनमुक्तीवर चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विषय: व्यसनाधीनतेवर उपाययोजना दर्शविणारे चित्र (पोस्टर) आणि रांगोळी.
चित्राची साईज १२ × १८ (दिड फुट × एक फुट.) असावी.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांपैकी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे
प्रथम रु.३०१/-, व्दितीय रु.२०१/- व तृतीय रु.१०१/- रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.
सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

नियम व अटी –
( चित्रकलेसाठी पेपरशीट दीड फूट × एक फूट, कलर ब्रश तसेच रांगोळी साठी लागणारे साहित्य रांगोळी आणि कलर सहभागींनी स्वतः आणावयाचे आहे.
वैभववाडी तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयातील ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि वैभववाडी तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तयार चित्र (पोस्टर )दिनांक २८ सप्टेंबर २०२४ पर्यंत जमा करावे. रांगोळी स्पर्धेसाठी नांव नोंदणी करुन दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात येऊन स्वतः काढावयाची आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी संपर्क नंबर: 771-985-8387 , +91 88060 81427, 9420261196
स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सकाळी दहा वाजता महात्मा गांधी जयंती आणि व्यसनमुक्ती सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
तरी कृपया वैभववाडी तालुक्यातील हायस्कूल मधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीवरील चित्रकला स्पर्धेत तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी व्यसनमुक्तीच्या प्रचार, प्रसार व प्रबोधन कार्यास सहकार्य करावे अशी विनंती नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles