अजेंडा विकासाचा, ध्यास तळवडेच्या सर्वांगीण प्रगतीचा! ; संदीप गावडे यांना जनतेची अभूतपूर्व साथ, मतदारांच्या स्वप्नांना मिळेल नवी पहाट! – ‘कमळ’ फुलणारचं जनतेत जोरदार चर्चा.

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीचे युवा व दूरदृष्टी असलेले उमेदवार संदीप गावडे यांनी विकासाच्या ठोस मॉडेलसह मैदानात दमदार एन्ट्री घेतली आहे. तळवडे, मळगाव, नेमळे तसेच निरवडे या सर्व गावांमध्ये त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद दिवसेंदिवस अधिकच बळकट होत चालला आहे.
“तळवडे जिल्हा परिषद नंबर वन करणारच!” हा निर्धार मनाशी बाळगून संदीप गावडे जनतेसमोर आपलं स्पष्ट व्हिजन मांडत असून, त्यांच्या आजवरच्या कामगिरीवर मतदारांनी विश्वासाची मोहोर उमटवली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला ठाम ध्यास मतदारांना भावत आहे.


विरोधकांकडून कितीही टीका अथवा आरोप झाले, तरी जनतेचा कौल मात्र विकासाच्या बाजूने झुकलेला स्पष्ट दिसतो. गावोगावी होत असलेल्या संपर्क दौऱ्यांमधून संदीप गावडे यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या विजयाची नांदी ठरत आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आत्तापर्यंत केलेले कार्य आणि पुढील काळासाठी आखलेला विकासाचा स्पष्ट रोडमॅप यामुळे मतदारांनी त्यांना भरभक्कम साथ देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात ‘कमळ फुलणारच’, अशी ठाम भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles