Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कास्ट्राईब संघटनेचे कार्य बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित : शिक्षण मंत्री दीपक केसरकर. ; शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील, कास्ट्राईब संघटनेची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

  1. सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना झपाटून काम करत आहे. मी सुद्धा बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध असून शिक्षकांच्या संपूर्ण समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावरून जे-जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आलो आहे आणि करीत राहील अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी येथे केले शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात श्री. केसरकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आकाश तांबे पदवीधर आमदार निरंजन डावखरे तसेच कासवाई शिक्षक संघटनेचे राज्यभरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुढे बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, राज्यातील सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती मी करून दाखवली अनेकजण टीका करतात पण त्या टीकेला अर्थ नाही शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत हे मी मान्य करतो मात्र आगामी काळात ते जास्तीत जास्त पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीन लवकरच कास्ट शिक्षक संघटनेची राज्यस्तरावर मी मंत्रालयात बैठक घेऊन उर्वरित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील यावेळी मंत्री केसरकर यांनी दिली.

यावेळी पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पदवीधरांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर मी आग्रही आहे. मला कोकणातील पदवीधर बांधवांनी खूप प्रेम दिले त्याचा उतराई होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. यावेळी मंत्री केसरकर व आमदार डावखरे यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ वैशाली पवार, स्नेहल तांबे, चंद्रकला तांबे, प्रतिभा चव्हाण, रंजन तांबे, वृशाली कदम, मनीषा ठाकूर, सुचित्रा कदम, नेहा कदम, ज्योती तांबे, पुजा जाधव यांना प्रदान करण्यात आले. तर सावित्रीबाई फुले शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार सुनीता कांबळे, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार भास्कर नादकर, मिलिंद मेस्त्री, भरत कुंभार,संजय राठोड, संजयकुमार आडे, धनाजी भोसले, उदय कदम, माणिक वंजारे, सुनील घास्ती, सुधीर तांबे, संदीप कोळापटे, राजेश कदम, आनंद तांबे, सुनील जाधव, सिद्धार्थ तांबे, कैलास खरबटे, संभाजी कोरे, सखाराम कांबळे, श्री. कांबळे, श्री करडे, दिलीप शेवाळकर, प्रेम राठोड , प्रा शिरसाटे, प्रा. वसंत नांदगिरीकर यांना प्रदान करण्यात आले‌. महात्मा फुले आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार राजेश तांबे, संगम कदम, महानंदा पवार, वैभव केंकरे, रामा गवस, निलेश पारकर, पंढरीनाथ आचरेकर, कैलास घाडीगावकर यांना तर
मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार हनिबुल्लाह जमादार, शमशुद्दीन आत्तार, शेख हबीब चॉंदभाई व फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार सईदा खान, श्रीम.बांगी यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर तांबे, समीर नाईक, संजीव मोहिते, अनिल कांबळे, एन पी कांबळे, मारुती कांबळे, अजिंक्य तांबे, राजेश कदम आदी उपस्थित होते

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles