सावंतवाडी : साटेली – भेडशी येथील यशवंत धणे॔, विजय धणे॔ व शैलेश धणे॔ यांच्या विरुद्ध साटेली भेडशी येथील एका महिलेने तिचा विनयभंग करून मारहाण केल्याचे आरोप करण्यात आलेले होते. आरोपींच्या विरुद्ध सेक्शन 354 ३२३ ५०४ ५०६ ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दोडामार्ग येथील जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांचे कोर्टत दाखल करण्यात आला.
फिर्यादीच्या वतीने सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासण्यात आले. सदरच्या साक्षीदारांच्या तोंडी जबाबदातून तसेच पोलिसांनी केलेल्या तपास कामातील विसंगती कोर्टात आरोपीच्या वतीने अँड अभिजीत पणदूरकर व अँड सुभाष पणदूरकर यांनी कोर्टात दाखवून दिली. तसा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून दोडामार्ग येथील जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपी यशवंत धणे॔ विजय धणे॔ व शैलेश धणे॔ यांची फिर्यादी यांनी केलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. अभिजीत पणदूरकर व अँड.सुभाष पणदुरकर यांनी काम पाहिले.