सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊ नये.
मुख्याध्यापक संघाने उद्या दिनांक 6 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे आंदोलन पुकारले आहे.त्या आंदोलनास आम्ही पाठिंबा व सक्रिय सहभाग म्हणून लेखी पत्र पाठवले होते. परंतु बरेच मुख्याध्यापकच काळ्याफिती लावून काम करणार असल्याने. तसेच बऱ्याच संस्था चालकांनी सुद्धा शाळा बंद ठेवू नये, शाळेवर विपरीत परिणाम होऊ नये, असा आदेश दिल्याने. *आमची सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना* सदरच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत नसून बाहेरून पाठिंबा देऊन काळ्याफिती लावून काम करणार आहे. कारण जिल्ह्यातील शिक्षक संघटना/संस्थाचालक संघटना उद्याच्या मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने व बाहेरून पाठिंबा देत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना सुद्धा मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या आंदोलनास बाहेरून पाठिंबा देऊन काळी फीत लावून काम करेल *शिक्षकेतर बांधवांनी उद्या आंदोलनात उपस्थित राहू नये.* *याची शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी नोंद घ्यावी ही विनंती.*
आपला विश्वासू
अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊ नये, मात्र पाठिंबा कायम – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची भूमिका.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


