कणकवली : उद्या दिनांक ५ ऑक्टोबर रोजी गोपुरी आश्रमात प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे ‘समजून घेऊ महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. म. गांधी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त गोपुरी आश्रमाच्या वतीने गोपुरी आश्रमाचे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे, वागदे) येथे उद्या शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर, २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ४.३० वाजता बेळगाव येथील विचारवंत प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांमध्ये वैचारिक पातळीवर मतभेद होते. परंतु दोन्ही महामानव सत्य, अहिंसा,समाज परिवर्तन, अस्पृश्यता निर्मूलन याच विचारांचे काम करत होते. दोन्ही महामानवांच्या विचारांमध्ये एक प्रकारचे साधर्म्य होते. भारत देशाच्या घडणीमध्ये दोन्ही मानवांच्या विचारात कमालीची एकवाक्यता होती. हे समजून घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्थरातील मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन गोपूरी आश्रम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे उद्या गोपूरी आश्रमात जाहीर व्याख्यान
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


