राजापूर : दांडिया खेळताना चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. वैष्णवी प्रकाश माने (रा. आजिवली- मानेवाडी, राजापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात घडली.
सरस्वती विद्यामंदिरात सरस्वती पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने महाविद्यालयात १० ऑक्टोबर रोजी दुपारी गरब्याचा कार्यक्रम सुरू होता. या गरब्यामध्ये वैष्णवी नाचत होती. नाचत असतानाच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. तेथील शिक्षकांनी तिला रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिचा तत्काळ इसीजी काढण्यात आला; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कुटुंबालाही धक्का
वैष्णवी ही सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होती. तिचे वडील सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण बँकेत कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. तिच्या पश्चात आई, वडील, काका, काकू, दोन लहान भावंड असा परिवार आ


