सावंतवाडी : येथील खासकीलवाडा येथे काल रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता लोकांना एक भला मोठा अजगर दिसून आले. त्या अजगराला पाहताच तेथील एक युवक रोमालडो याने त्याचे शिक्षक व प्रसिद्ध सर्पमित्र श्री नवीद हेरेकर यांना संपर्क साधले.
यावेळी हेरेकर व त्यांची पत्नी नबीला हेरेकर यांनी तेथे पोहचत त्या अजगराला पकडले. हा अजगर पाईपमध्ये शिरलेला असल्याने त्याला पकडण्यास एक तासांपेक्षा अधिक वेळ लागला.
नंतर त्याला पकडून त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा अजगर चक्क ११ फुटी व मादी जातीचा होता.