Tuesday, September 16, 2025

Buy now

spot_img

कोमसापचा ‘साहित्यिक दीप’ तेवत राहो.! : डॉ. राजेश नवांगुळ ; सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे साहित्यिक उपक्रम स्तुत्य आहेत. साहित्य चळवळीचा हा दीप  चिरंतन तेवत राहो, अशी सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. राजेश नवांगुळ यांनी व्यक्त केले. कोमसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच औचित्य साधून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कोकण मराठी साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा राणी पार्वती देवी हायस्कूल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिल्हास्तरीय साहित्य संमेलन व युवा साहित्य संमेलनचे आयोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच या सभेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त कोमसाप सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.रूपेश पाटील, अँड. नकुल पार्सेकर यांनी मनोगत व्यक्त करत आभार व्यक्त केले. केंद्रीय सदस्या ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. नवांगुळ यांनी कोमसापच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमांचे कौतुक करताना साहित्य चळवळीचा हा दीप चिरंतन तेवत ठेवावा, असे मत व्यक्त केले.

डॉ. नावांगुळ, प्रा. रूपेश पाटील यांच्याकडून आर्थिक देणगी जाहीर –

दरम्यान, डॉ. राजेश नवांगुळ यांनी त्यांच्या मातोश्री सौ. सुनिला नवांगुळ यांच्या नावे तसेच प्रा. रुपेश पाटील यांनी त्यांच्या आजी कै.अजबबाई यशवंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी रुपये पाच हजारांची देगणी कोमसाप शाखेला जाहीर केली.

याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सदस्या सौ. उषा परब, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, आरपीडीचे मुख्याध्यापक प्रा. जगदीश धोंड, माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, अँड. अरूण पणदूरकर, डॉ. विनया बाड, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अँड. नकुल पार्सेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे, प्रा. रूपेश पाटील, दीपक पटेकर, विनायक गांवस, संजीव मोहिते, किशोर वालावलकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तावडे, सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी तर आभार अभिमन्यू लोंढे यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles