- सावंतवाडी : येथील भाजपाच्या युवा शहर अध्यक्षपदी राज वरेरकर यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांना जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. श्री. वरेरकर हे युवा कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे ते पक्षाचे काम करीत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना ही संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपल्याला पक्षाकडून दिलेल्या संधीचा निश्चितच फायदा करुन युवा संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रीया श्री. वरेरकर यांनी निवडीनंतर दिली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षीत मांजरेकर, जावेद खतिब, संजय वरेरकर अमेय मडगावकर, आशिष शिर्के, संजय गोसावी, साल्वादोर डीसोझा, अजय डिसोझा, गौरव कदम आदी उपस्थित होते.