Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सौर ऊर्जा हायमास्टचे लोकार्पण ; देव्या सूर्याजी, गजानन नाटेकर यांचे प्रयत्न फळाला.

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रूपयांचे सौर ऊर्जा हायमास्ट शहरात बसविण्यात आले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान व मिलाग्रीस हायस्कूल येथील शासकीय जागेतील हायमास्टच लोकार्पण करण्यात आले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व गजानन नाटेकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ३ लाख ४७ हजारा रूपयांचा व मिलाग्रीस हायस्कूल समोरील शासकीय जागेत ६ लाख ८१ हजारांचा निधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार निधीतून मंजूर केला होता. या सौर ऊर्जा हायमास्टचे लोकार्पण रविवारी करण्यात आले‌. यावेळी मिलाग्रीसचे फादर मिलेट डिसोझा, शिवसेना शहरप्रमुख बाबू कूडतरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,अनारोजीन लोबो,भारती मोरे,दिपाली सावंत,संजय पेडणेकर,सुनिल नाईक,शर्वरी धारगळकर,शिवानी पाटकर, किरण नाटेकर, दत्ता सावंत, सागर गावडे आदी उपस्थित होते.

 

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles