Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अद्भुत, अनाकलनीय.!, …अन् तरंगकाठी विनाआधार उभी राहिली.!

सावंतवाडी : प्रत्येक सणाप्रमाणे विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्याची प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आहे, आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातील गोवा सीमेनजिकच्या सातोसे गावात सुद्धा दसरा अशाच उत्साहात साजरा केला जातो. घटस्थापनेनंतर ९ दिवस रोज रात्री भजन आणि फुगड्यांच्या कार्यक्रमानंतर दस-या दिवशी शिवलग्नासाठी श्री देवी माऊलीची तरंगकाठी (एक मुखवटा आणि दोन हाताचे पंजे) सजवली जाते. श्री देव कुळकार मंदिर येथून दैवी संचाराद्वारे तरंगकाठी शिवलग्नासाठी श्री देवी माऊली मंदिर येथे आणली जाते. त्यानंतर प्रथेप्रमाणे शिवलग्न सोहळा उत्साहात साजरा केला जातो. नंतर दैवी संचाराद्वारे तरंगकाठी मानाप्रमाणे मानक-यांच्या घरी पावनेर (पाहूणचार) साठी प्रस्थान करतात. तेथे देवीची पूजा, भजने आणि फूगडी रूपी सेवा केली जाते. भक्तजनांसाठी देवीचा महाप्रसाद सुद्धा पर्वणी असतो.

त्या दरम्यान शिवलग्नापूर्वी श्री देव नितकारी मंदिर (चव्हाटा) येथे क्षणिक विसाव्यासाठी थांबा घेण्याची प्रथा आहे. वर्षानुवर्षे ही प्रथा खंड न पडता चालू आहे.
मात्र यावर्षी एक आगळा वेगळा क्षण ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवण्याचा योग भाविकांसाठी जुळून आला. विसाव्यासाठी परब वसाच्या (मेळेकारी) दैवी संचाराद्वारे घेण्यात आलेली तरंगकाठी जमिनीवर ठेवताक्षणी तरंगकाठी कुठल्याही आधाराशिवाय उभी राहिली. आणि उपस्थित भक्तगणांच्या नजरेचे पारणे फिटले. जानकारांच्या माहितीनुसार, यापूर्वी १० वर्षापूर्वी अशाच प्रकारे तरंगकाठी विना आधार उभी राहिली होती. त्या घटनेला या निमित्ताने उजाळा मिळाला. अशाप्रकारे सातोसे गावच्या श्री देवी माऊलीच्या जागृत देवस्थानाची प्रचिती तमाम भाविक भक्तजनांना दिसून आली.
छायाचित्रात ह्यावर्षी उभी राहिलेली तरंगकाठी तसेच दहा वर्षपूर्वीची तरंगकाठी दिसून येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles