वेंगुर्ला : तालुक्यातील आसोली गावातील श्री देव नारायण पंचायतन देवस्थानचा प्रसिद्ध दसरोत्सव आश्विन शुद्ध दशमीला शनिवार दि. १२ऑक्टोबर रोजी श्री देव नारायण मंदिर येथे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
आसोली येथे श्री देव नारायणाच्या दसरोत्सवाला पंचक्रोशीतून तसेच विशेषतः मुंबई,गोव्यातून असंख्य भाविकानी उपस्थिती लावली. पंचक्रोशीतील तसेच मुंबई आणि गोवा येथील भाविकांनी या दसरोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल आसोलीतील समस्त गांवकरी व मानकरी मंडळी ,आसोली ग्रामस्थ आणि श्री देव नारायण पंचायतन देवस्थान कमिटी आसोलीतर्फे भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.