Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सरमळे येथील माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.! ; ‘लाडकी लेक’ अर्चना घारेंची देणार साथ.!

सावंतवाडी : सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच, तसेच गेली अनेक वर्षे सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे, गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व अर्जुन गुणाजी गावडे यांनी सौ. अर्चनाताई घारे -परब यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी अर्जुन गावडे म्हणाले, ”अर्चना ही आमची लाडकी लेक आहे आणि तिचे आज तळागाळातील कार्य पाहता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या विधानसभेसाठी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन”. यावेळी त्यांच्या समवेत रामदास सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर, नंदकिशोर साटेलकर, विनायक परब, सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles