Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

तिसरी आघाडी १५० जागा लढणार, शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार ; शरद पवारांवरही हल्लाबोल.

पुणे : पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचं बोलणं सुरु –

दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती  परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला.! 

सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचे कडू म्हणाले. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू म्हणाले.

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार : राजू शेट्टी

स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आमनच्याकडे छोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. प्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles