नेमळे हायस्कूलचे शिक्षक उमेश राऊळ ‘लई भारी’, विविध स्पर्धेत घेतली यशस्वी भरारी!

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथील संस्कार इंटरनॅशनल स्कूल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान  प्रदर्शनात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक उमेश उत्तम राऊळ यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.  श्री राऊळ यांनी माध्यमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्यकृतीत तालुक्यातून दुसरा क्रमांक संपादन केला आहे. त्यांनी ‘गंमत प्रकाशाची ‘ हे अध्यापक निर्मित साहित्य सादर करून दुसरा क्रमांक मिळवला आहे. मागील 18 वर्षात त्यांनी तब्बल 16 वर्ष विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळवले आहे. हा एक आगळावेगळा विक्रम ठरला असून त्यांचे सर्व स्तरावरून विशेष अभिनंदन होत आहे.

दरम्यान, श्री राऊळ यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट मार्फत आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतही सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळविला असून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री. आ. भि. राऊळ, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, पालक वर्ग, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles