बालसंस्कार, पौष्टिक आहार आणि मुक्त विचारांची त्रिसूत्रीच घडवेल सुदृढ पिढी! : छाया घाडीगावकर. ; पाडलोस येथील बालसभेत प्रभावी मार्गदर्शन, चित्रकला-वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, शाडूच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन.

बांदा : पालकांनी मुलांना योग्य संस्कारांसह विचार मांडण्याची मोकळीक द्यावी, तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे संवेदनशीलतेने लक्ष ठेवावे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित व पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा असून, योग्य आहारामुळेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहते, असे प्रतिपादन सावंतवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी छाया घाडीगावकर यांनी केले.
पाडलोस येथे एकता प्रभाग संघ मळेवाड अंतर्गत स्वामी समर्थ ग्रामसंघ, पाडलोस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालसभेत घाडीगावकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, कोषाध्यक्ष साईश नाईक, सरपंच सलोनी पेडणेकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ करमळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, उमेदकडून एकता प्रभाग संघ व्यवस्थापक अनुप देऊलकर, मळेवाड प्रभागच्या व्यवस्थापक प्रचिती मडुरकर, ग्रामसंघ कोषाध्यक्ष मयुरी कुबल, सचिव संगीता गावडे, लिपिका शीतल गावडे, सीआरपी नेहा नाईक, पाडलोस विकास सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, उपाध्यक्ष सुधीर गावडे, ग्रामस्थ अशोक गावडे, अमोल माधव, रामू गावडे, राघोबा गावडे, अंकुश माधव, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 60 मुलांनी सहभाग घेतला होता. यशप्राप्त सर्व विद्यार्थ्यांना उत्तम नारायण सावंत यांच्या स्मरणार्थ जिल्हा बँकचे आत्माराम(आबा) सावंत यांनी वक्तृत्व स्पर्धा तर सावंतवाडी येथील हॉटेल व्यावसायिक राजेश लाड यांनी चित्रकला स्पर्धेस बक्षिसे पुरस्कृत केली होती. स्पर्धा परीक्षक म्हणून अधिकारी छाया घाडीगावकर व सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ करमळकर यांनी काम पाहिले.
*शाडूच्या मूर्तींना बक्षीस*
ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले. विसर्जनानंतर पीओपी मूर्तींची होणारी विटंबना खुप वाईट आहे. शाडू मातीच्या मूर्तीला बक्षीस दिले जाणार असून सर्वांनी मातीच्या मूर्ती बनविण्याचे आवाहन आळवे यांनी केले.

मळेवाड प्रभागात प्रथम क्रमांक – 
मळेवाड प्रभागमधील बालसभांमधून पाडलोस येथील ओम गणेश बालसभेला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याची माहिती एकता प्रभाग संघ व्यवस्थापक अनुप देऊलकर यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles