विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने जोपासली कृषीसंस्कृती! ; ‘बांधावरची शाळा’ उपक्रम उत्साहात संपन्न.

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीत जावून भाताची लावण कशी करतात?, शेतीसाठी लावण करतांना चिखल कसा करावा?, भाताचे रोप कसे हळूवार उपसून त्यांच्या पेंड्या कशा पद्धतीने बांधाव्यात?,  याचे प्रात्यक्षिक शिक्षण शेतात जावून घेतले सर्वांचा पोशिंदा शेतकरी राजा दिवसरात्र शेतीत घाम गाळून मोत्यासारखे धान्य पिकवून संपूर्ण जगाला जीवदान देतो शेतकऱ्याचे कष्ट परिश्रम विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थांनी स्वतः कृतीकरून अनुभवली भारतीय शेतीची परपंरा जोपासली. शाळेतील शिक्षणाबरोबरच जीवन जगण्याचे कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांनी अनुभवले.

प्रशालेतील पर्यावरण विभाग व हरितसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बांधावरची शेती हा उपक्रम श्री प्रसाद राणेसर श्री जनार्दन शेळके, सौ विद्या शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचे महत्व कृतीतून दाखवून शेती संस्कृती जोपासण्याचे शिक्षण दिले विद्यार्थ्यांनी आनंदी वृत्तीने शेती कामात सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सरांनी प्रोत्साहन देऊन सर्वांचे अभिनंदन केले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले .

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles