Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यक्ती सन्मानास पात्र : डॉ. दिनेश नागवेकर ; ‘आरपीडी’च्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांची कोकण विभागीय मंडळावर ‘अशासकीय सदस्य’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहसत्कार सोहळा संपन्न.

सावंतवाडी : कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी आणि अभ्यासयुक्त सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानेच कौतुकास्पद सन्मानाला ती व्यक्ती पात्र ठरते. तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात दिलेले भरीव योगदान पाहूनच आज आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळ (रत्नागिरी) वर कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. तेव्हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद व आनंदाचा क्षण आहे, असे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेज, सावंतवाडी येथे उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळ (रत्नागिरी) वर कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीपर आयोजित सत्कार आणि अभिनंदनीय कार्यक्रमात गौरवोद्गार काढून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ.सुमेधा नाईक ह्या मागील 27 वर्षे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करत असून आता 4 वर्षांपासून उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. एम. ए. (भूगोल, मराठी, विषय संप्रेषण), एम.एड., पीएच. डी., शालेय व्यवस्थापन इ. शैक्षणिक पदवी त्यांनी संपादन केली आहे. बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षक व नियामक म्हणून काम तसेच केंद्र संचालक म्हणून कार्य केले आहे. तसेच भूगोल विषयाच्या पुस्तकांचे सहलेखकांबरोबर लेखन,
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील भूगोल कॉन्फरन्स मध्ये सहभाग व निबंध वाचन, विविध जर्नल्समधून भूगोल विषयाचे संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध, भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक, श्रीराम वाचन मंदिर संचालक, कोकण जिऑग्राफर असोसिएशन ऑफ इंडिया संचालक, सिंधुदुर्ग साहित्य संघ उपाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी सिंधुदुर्ग संचालक आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव गुरुवर्य व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक प्रा. सतीश बागवे, मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर,पर्यवेक्षक संजय पाटील.सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.विनिता घोरपडे, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा.रणजीत राऊळ, प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. संतोष पाथरवट, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. सविता कांबळे, प्रा. पवन वनवे, प्रा.दशरथ सांगळे, प्रा. वामन ठाकूर, प्रा. महाश्वेता कुबल, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. माया नाईक, प्रा.जोसेफ डिसिल्वा, प्रा. राहुल कदम, प्रा. विजया सावंत, प्रा. निलेश कळगुंटकर आणि शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles