सावंतवाडी : येथील सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांची कोकण शिक्षण मंडळावर ‘अशासकीय सदस्य’ म्हणून निवड करण्यात आली आहे. माध्यमिक विद्यालय, माडखोल या शाळेत तब्बल ३४ वर्षे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाला मराठी विषयाचे अध्यापन करून श्री. गावडे हे निवृत्त झाले आहेत. मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर त्यांनी कार्य केले आहे .मराठी भाषा कौशल्य यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. इयत्ता दहावीचे दहा वर्ष परीक्षक म्हणून कार्य केले. व तीन वर्ष नियामकक काम पाहिजे होते. त्याचप्रमाणे बारावीचे पाच वर्ष परीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्यकेले होते.
महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघात 1998 पासून कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन राज्यस्तरीय कृती सत्र घेऊन यशस्वी केले आहेत. सध्या ते राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात आहेत. साटम महाराज वाचन मंदिर दाणोली या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून विविध उपक्रम घेत आहेत. राज्याच्या महावाचन कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो .सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य असून जिल्ह्यातील ग्रंथालयांना विविध उपक्रमाबाबत मार्गदर्शन करतात .मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ठिकठिकाणी उपक्रम घेतात. मराठी भाषेचा विकास आणि समृद्धी व अभिरुची निर्माण करण्यात करीता शाळा शाळांमध्ये व्याख्याने घेऊन. वाचन संस्कृतीला प्रेरणा देण्याचे कार्य सतत चालू आहे .साने गुरुजी कथामाला. बॅरिस्टर नाथ पै यांचा जीवन परिचयृ महाराष्ट्रातील थोर लेखकांची माहिती. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे कार्य .या विषयावर विविध व्याख्याने ते देत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञनेश्वर म्हात्रे , शिखण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तसेच सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.