Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

अर्चना घारे समर्थक पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला ; घारे – परबांना सावंतवाडीची उमेदवारी मिळाण्यासाठी केला आग्रह

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथे भेट घेत सावंतवाडी मतदारसंघाबाबत अर्चना घारे परब यांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले आहे. आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा अॅड.  रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांसह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा अर्चना घारे परब यांच्यासाठी सुटावा याबाबत आग्रह केला आहे. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही.

दुसरीकडे कालचं भाजपाला राम राम ठोकून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी मशाल हाती घेत सावंतवाडी विधानसभेसाठी दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांसाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. आगामी काळात ही जागा कोणासाठी सुटते व घारे – परब आणि राजन तेली नेमकी काय भूमिका घेतात?,  याकडे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles