सावंतवाडी : आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना धनादेश प्रदान करण्यात आले. कास येथील कृष्णा कासकर या उच्च रक्तदाब मधुमेह आजाराने पिडीत, वैजयंती सावंत या मोर्येवाडी बांदा येथील अर्धांगवायू उच्च रक्तदाब आजाराने पिडीत, कृष्णा पेडणेकर या तांबुळी असनीये येथील मणक्यांच्या आजाराने पिडीत आणि आत्माराम विर्नोडकर या बांदा येथील संधीवात उच्च रक्तदाबाने पिडित गरजू रुग्णांना डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.