Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले ‘या’ पक्षाचे कार्यकर्ते ; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या.

अकोला : अकोल्यातील एका कार्यक्रमात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर, योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडण्यात आलं. अकोल्यात आज योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर विचार सभा सुरू होती. या विचारसभेत योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांच भाषण सुरू असताना त्यांच भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अकोल्यातील जिल्हा परिषदच्या कर्मचारी भवन मधला हा संपूर्ण प्रकार असून या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने काही काळासाठी तेथील वातावरण चिंताजनक बनले होते. तर, संयोजकांनी योगेंद्र यादव यांच्याभोवती सुरक्षेचं वर्तुळ निर्माण केल्याचंही पाहायला मिळालं.

योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, जवाब दो.. जवाब दो… असे नारे देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी, काही कार्यकर्त्यांनी स्टेजवर जातं माईक हाती घेऊन सामानाची फेकाफेकही केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नियोजितपणे सुरू असलेला योगेंद्र यादव यांचा येथील कार्यक्रम बंद पाडण्यात आला आहे. मात्र, वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून कशामुळे हा गोंधळ घालण्यात आला, यावर अद्याप स्पष्टपणे सांगण्यात येत नाही. पण, संविधानाच्या अनुषंगाने काय चर्चा केल्या, काय विचारमंथन केले, असा जाब वंचितकडून विचारला जात आहे.

कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केले

अकोल्यातल्या आज ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर ही विचारसभा आयोजित करण्यात आली आहेय.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने या विचार सभेच आयोजन केले गेलं होतं. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेंद्र यादव उपस्थित होते. ज्यांची ओळख भारत जोडो अभियानाचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशी आहे. याचं विचारसभेत आज वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याने चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles