सावंतवाडी : कोकण रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गणेश सुर्वे यांना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या हस्ते खास पुरस्कार देण्यात आला .
कोकण रेल्वेच्या विविध विभागांमध्ये लक्षणीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा कोकण रेल्वेच्या स्थापना दिनानिमित्त गौरव सोहळा मडगांव येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. त्यामध्ये सुर्वे यांचा समावेश होता. महामंडळाचे संचालक राजेश भडंग आणि आर. के . हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सुर्वे हे अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व संवेदनशील व्यक्तिमत्व असून आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक कार्यातही सातत्याने सहभागी होत असतात. गणेश सुर्वे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र