Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

माझ्यावर बोलण्याआधी राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता व प्रतिमा तपासावी.! ; शांत, संयमी अर्चना घारे – परब यांचे तेली यांना प्रत्युत्तर

सावंतवाडी : महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदरपासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. कालपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता, टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता ?, जरा आठवा. पवार साहेबांनी कोकणसाठी काय केले ? तुम्हीच प्रेस घेऊन सुप्रियाताई सुळे यांना सिंधुदुर्ग दौर्‍यावर असताना विचारले होते ना? आता आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला. आणि मग पवार साहेबांची आठवण झाली? आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त तुमच्या सारख्या आयाराम गयारामाचे काम करायचे का? पक्षाच्या कठीण काळात पक्षा बरोबर आम्ही रहायचे आणि आयत्या वेळेला तुमच्या सारख्या सराईत दलबदलूने यायचे आणि आम्ही त्याचा उदो उदो करायचा ? असे कसे चालेल तेली साहेब ? तेव्हा या पुढे मीच नाही तर कोणत्याही स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर बोलताना विचार करून बोला.

आपली मतदारसंघात विश्वासार्हतता काय ? प्रतिमा काय ? एकदा तपासून पहा. तुम्हाला या मतदारसंघातील जनतेने दोन वेळा का नाकारले याचे देखील एकांतात एकदा जमत असेल तर आत्मचिंतन करा. 2019 ला तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बंडखोरी केली होती ? तुमच्या पाठीमागे कोण होते ? काल पर्यंत तुम्ही कोणत्या विचारांबरोबर होते ? उद्या तिकडे पुन्हा कशावरून जाणार नाही. या बद्दलही मतदारांमध्ये तुमच्या विषयी शंका आहे. कारण तुम्ही पक्ष बदलण्यामध्ये पटाईत आहात. तुमची उमेदवारी मुळात कोणत्याच स्वाभिमानी कार्यकर्त्याला पसंत नाही. महाविकास आघाडीतील याच स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या आणि मायबाप जनतेच्या सांगण्यावरून मी या निवडणुकीत उभी आहे.
त्यामुळे बोलताना पुराव्या सह बोला. तुम्ही असाल कणकवलीचे म्हणुन मी घाबरणार नाही. मी देखील परबांची लेक आहे. माझ्यावर सावंतवाडीचे संस्कार आहेत. मी स्वतःहून कोणावर टीका टिपणी करात नाही. पण तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करत असाल तर मी गप्प बसणार नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles