सावंतवाडी : गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे शाळेने महाराष्ट्र राज्य क्रीडा युवा व संचालनालय पुणे, आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत इयत्ता सहावीतील पियुष संजय परब याने १४ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी संचालिका सौ. मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, क्रीडा प्रशिक्षक सौ. सोनाली खडपकर व आलिस्का अल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या पियुष परबचे सुयश.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


