रमेश आरोसकर
सावंतवाडी : तालुक्यातील दांडेली गावामध्ये महायुतीचे उमेदवार दीपक भाई केसरकर यांचा प्रचाराचा शुभारंभ श्री देव दाडोबाला नारळ ठेवून करण्यात आला. यावेळी केसरकर हे बहुमताने विजयी व्हावेत असे गाऱ्हाणे श्री देव दाडोबा चरणी घालण्यात आले.
यावेळी दांडेली भाजप बूथ अध्यक्ष रुपेश मोरजकर, शिवसेना शाखाप्रमुख तानाजी खोत, सरपंच निलेश आरोलकर, माजी सरपंच संजय पांगम बाळा मोरजकर, कृष्णा पालयेकर युवा सेनेचे योगेश नाईक, तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.