नागपूर : माझ्यावर दगडी मारा अथवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख घाबरणार नाही. तसेच हल्ला करणाऱ्याला अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही, अशी पहिली प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रुग्णालायातू डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिली आहे. भाजपवाल्यांनी मला दगडाने मारलं किंवा गोळीने मारलं तरीही मी मरणार नाही, आणि कोणाला सोडणार पण नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
मी मरणार नाही अन् कोणाला सोडणार पण नाही- अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. देशमुख काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय. यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरसाठी रेफर करण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांना घेऊन त्यांचे सहकारी काटोलवरून नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आज डिस्चार्ज दिला गेलाय. दगड मारल्यानंतर कारच्या फुटलेल्या काचने त्यांना इजा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. उपचार दरम्यान देशमुख यांचा सिटी स्कॅन नार्मल आला असून काल त्यांना ऑब्जेर्वेशन मध्ये ठेवणे गरजेचे होतं. तर डोकं दुखत असल्यामुळे त्याना ऑब्जेर्वेशन मध्ये ठेवावं लागलं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते.


