Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत उद्या वाचक स्पर्धा, श्रीराम वाचन मंदिराचे आयोजन.

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने उद्या शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय :- जयवंत दळवी यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येईल.

२. दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेच (वक्तृत्व) अपेक्षित आहे.

३. वेळ मर्यादा ७ मिनिटे.

४. प्रथम तीन क्रमांकाना रोख रकमेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रु. ५००/-, द्वितीय क्रमांक रु. ३००/-, तृतीय क्रमांक रु. २००/- आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येईल.

५. स्पर्धकांनी आपली नावे २१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथालयात द्यावीत.

६. अधिक माहितीसाठी ७३८५९७५२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

७. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी होणा-या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भाग मिळेल. तरी सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्री. रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles