Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

भारतीय संविधान म्हणजे समतेचे प्रतीक! : प्रा. पवन बांदेकर ; ओझर विद्यामंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न.  

मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशालेचे साहाय्यक शिक्षक पांडुरंग राणे यांनी सुंदर हस्तलिखित केलेली संविधानाच्या उद्देशिकेची प्रत शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आली.
संविधान दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारत एक लोकशाही गणराज्य, भारतीय संविधान निर्मितीचे टप्पे, भारतीय संविधान-एक जीवनपद्धती, आपले हक्क आणि कर्तव्ये, माझे संविधान माझा अभिमान इत्यादी विषयांवर निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दुपारच्या सत्रामध्ये ‘भारतीय संविधान’ या विषयावर भंडारी जुनिअर कॉलेज मालवणचे प्राध्यापक पवन बांदेकर त्यांचे व्याख्यान झाले. ‘भारतीय संविधाने समतेचे प्रतीक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सारे भारतीय ऐक्याच्या धाग्याने बांधले गेलो आहोत, असे प्राध्यापक बांदेकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. ओझर विद्यामंदिरने संविधान दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेचे शिक्षक पांडुरंग राणे, शिवराम सावंत, अभय शेर्लेकर यांनी मेहनत घेतली. संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय समितीचे सदस्य विजय कांबळी, पालक प्रतिनिधी चंद्रशेखर कांबळी, श्रावणी कांबळी, माजी विद्यार्थिनी निष्ठा कांबळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक पांडुरंग राणे यांनी केले

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles