नाशिक : नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान’या नामांकित साहित्य संस्थेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यक्षेत्रात भरीव काम करणार्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कृत करण्यात आले.
राजगुरुनगर(चांदुस) येथील कवी व म. सा. प.शाखा राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे यांना ‘स्व. किशोर पाठक स्मृती काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रोख रक्कम, सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक येथील प. सा. नाटय गृहात झालेल्या या समारंभात साहित्यिक लक्ष्मण महाडिक, प्राचार्य ज्ञानोबा ढगे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार , माजी आमदार नानासाहेब बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. कवी राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत केंदळे यांनी आभार मानले.
ADVT –