Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

३० नोव्हेंबर रोजी रेडी येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रौत्सव!

वेंगुर्ला : नवसाला पावणारी रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली रेडीचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ (कार्तिक अमावास्या) रोजी संपन्न होणार आहे.

🌸सकाळी ६.०० वाजता श्री देवी व परिवार देवतांची पुजा,

🌸सकाळी ८.०० वाजता उत्सव मुर्ती सजावट, तद़नंतर ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रम प्रारंभ,

🌸सकाळी ११.०० नंतर मंदिराच्या सभामंडपात देवीच्या साड्यांचा लिलाव,

🌸रात्रौं ११.३० वा. संबंधितांना तेल वाटप करणे व पुराण वाचन करणे,

🌸रात्रौं ११.४५ वा. देवी समोरील कुवाळा ज्योतीचा विधी.

🌸रात्रौं ठिक १२.०० वाजता आकर्षक फटाकांच्या आतषबाजीत श्रीे देवीची पालखी प्रदक्षीणा त्यानंतर रात्रौ वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. खास आकर्षक फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई यावेळी केली जाणार आहे.

तरी सर्व भाविकानी या उत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती, देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles