हैदराबाद : तिलक वर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. दक्षिण अफ्रिकेत टी20 मालिकेत बॅक टू बॅक शतकी खेळी केल्यानंतर देशांतर्गत सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही फॉर्म कायम आहे. तिलक वर्माने मागच्या 6 पैकी पाच सामन्यात शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत मेघालयविरुद्ध 151 धावांची खेळी केली. बंगाल विरुद्ध 51 धावा केल्या. पण राजस्थान विरुद्ध 13 धावा करून बाद झाला. पण बिहारविरुद्ध पुन्हा एकदा आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं.डावखुऱ्या तिलक वर्माने हैदराबादच्या विजयात मोलाची साथ दिली आहे. बिहारने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 118 धावा केल्या. या धावा हैदराबादने अवघ्या 75 चेंडूत पूर्ण केल्या. तिलक वर्माने 31 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. तर रायडूने 33 चेंडूत 53 धावा केल्या. तिलक वर्माने 4 षटकार आणि एक चौकार मारला. तिलक वर्माने आपल्या फलंदाजीत खूपच सुधारणा केली आहे. मागच्या काही सामन्यातील त्याची बॅटिंग पाहता त्याने चांगली फटकेबाजी केली आहे. तिलक वर्माला मिडल ऑर्डर किंवा टॉप ऑर्डरमध्ये खेळायला आवडतं.
ADVT –




