Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी माजी वनसंरक्षक ॲड.सुभाष पुराणिक यांची नियुक्ती.!

सावंतवाडी: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शाखा पुनर्बांधणीसाठी दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी सायं.४.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.नेहा संतोष जोशी, प्रा .सुभाष गोवेकर, सहसचिव कोकण प्रांत आणि इतर कोकण प्रांत सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावर निवृत्त वन संरक्षक ॲड. सुभाष पुराणिक यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.  यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड,  जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, संदीप टोपले, चेतन वाळके, बाळासाहेब बोर्डेकर, समीर शिंदे, मनोज घाटकर, अस्लम खतिब, जयराम वायंगणकर, शैलेश कुडतरकर, विजय ओटवणेकर, तुकाराम म्हापसेकर, दत्ताराम सडेकर, परशुराम चव्हाण आदी सदस्य, ग्राहक उपस्थित होते.

दिल्ली येथे 1974 साली स्वर्गीय मा.बिंदुमाधव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत ‘ अखिल भारतीय ग्राहक पंचायत ‘ स्थापन झालेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1998 पुर्वीपासून कार्यरत असलेल्यां अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा आणि सर्व तालुक्या शाखेच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱी आणि सदस्यांची पुनर्बांधणी करणेसाठी कालची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्राहक सदस्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ नेहा जोशी यांनी सांगितले की, व्यावहारिक जीवनात वावरताना बोकाळलेली व्यवस्था उदाहरणार्थ -खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून अंमलात आणल्या जाणार्‍या अनिष्ट प्रथा – उदाहरणार्थ अवाजवी नफा मिळवण्याचे हेतूने बेकायदेशीरपणे चुकीची वजन- मापे वापरण्याबरोबर भरमसाठ किंमत आकारणे, काळाबाजार, कृत्रिम टंचाई, अन्न पदार्थातील अनारोग्यास कारणीभूत ठरणारी भेसळ इत्यादींबाबत होणारी फसवणूक, पिळवणूक, खासगी संस्थां, अनेक शासकीय विभाग, स्वराज्य संस्थांमधील केला जाणारा अन्याय, दिरंगाई, भ्रष्टाचार इत्यादींबाबत, जीवनशैली-आर्थिक घडी विस्कटली जावू नये आणि सर्वानाच आनंदात आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी, तटस्थ भूमिकेतून अन्याय,अत्याचारांविरुद्ध, संयम राखून कायदेशीर मार्गाने झटणाऱ्या, ईच्छाशक्ती असणाऱ्यांनी, खंबीरपणे, जिद्दीने कार्य करण्याची तळमळ असणाऱ्यांनी संघटित होऊन कार्य करण्याची केवळ गरज नव्हे तर अत्यावश्यकता आहे..
प्रा.सुभाष गोवेकर यांनी प्रस्तावना करून अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राहक पंचायत विस्तार करून तालुकावार शाखा स्थापन करून ग्राहक पंचायत संघटनेचा विस्तार करण्याची गरज असल्याचे नमूद केले. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा नूतन जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पुराणिक यांनी आपल्या निवडीसाठी उपस्थितांचे आभार मानले आणि लवकरच नूतन जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा शाखा विस्तार आणि सर्व तालुक्यात शाखा स्थापन केल्या जातील असे सांगून “जागो ग्राहक जागो” या ब्रीद वाक्यानुसार ग्राहकांनी जागृत व्हा, संघटित व्हा असे आवाहन केले.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles