कणकवली : विद्यार्थी वर्गाने विद्यार्थी दशेत असताना आपण संशोधन का करावे हे समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्ग संशोधक झाल्यास देशाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना निर्माण होऊ शकतील. त्यातून समाजाची उन्नती होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या द्वितीय सत्र प्रशिक्षण उद्घाटक म्हणून बोलताना प्रतिपादन केले.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे सहाय्यक सहाय्यक संचालक डॉ. कुणाल कुणाल जाधव, कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, क्षेत्र समन्वयक डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सुरेश पाटील, प्रा. सी.डी. भेंकी, प्रा.सचिन राऊत तसेच विभाग प्रमुख प्रा.प्रियांका लोकरे आदी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे पुढे म्हणाल्या की, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील विद्यार्थ्यांनी या विभागाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवताना समाजाच्या उन्नतीचा पण विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा.
कणकवली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांना या विभागातून आपले व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन केले.
डॉ.कुणाल जाधव यांनी या विभागाच्या कार्याचा आढावा घेतला व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत द्वितीय सत्रात होणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थित विस्तार कार्यशिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिली. जानेवारी २०२५ जिल्हास्तरीय उडान महोत्सव घेण्यात येणार असल्याचे सूचित केले.
या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका लोकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले, तर उद्घाटन सत्राचे आभार प्रा. नूतन घाडीगावकर यांनी मानले, समारोप सत्राचे आभार डॉ . सुरेश हुसे यांनी मानले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रियांका लोकरे, कॅ. डॉ. बी. एल. राठोड, डॉ. टी. एस. डीसले, प्रा. पूजा सुतार व कणकवली महाविद्यालयाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.
ADVT –




