Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली कॉलेजचे उल्लेखनीय यश!

कणकवली : ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ न्यू इंग्लिश स्कूल फोंडा येथे नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात कणकवली कॉलेज कणकवलीच्या अकरावी विज्ञान वर्गातील कु.दिया प्रभुदेसाई, कु. स्नेहल रेडकर, कु. सुकन्या राणे , कु. पूर्वा प्रभुदेसाई, कु. वरदा फणसळकर , कु. हिमानी गोसावी या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, निबंधलेखन, प्रश्नमंजुषा आणि प्रतिकृती सादरीकरण स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विज्ञान शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये कु. दिया प्रभुदेसाई हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, स्नेहल रेडकर हिने निबंध स्पर्धेमध्ये प्रथम व कु. सुकन्या राणे व कु. पूर्वा प्रभुदेसाई यांनी प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली आहे.
या त्यांच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक महादेव माने आणि सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासाठी श्री विजयकुमार सावंत, सुप्रिया जोशी, सुषमा कांबळे, रोहिणी कदम इ. शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles