Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मोठी बातमी : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये – राज ठाकरेंचा इशारा.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे.  आताच सांगतो  माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर  सभाही  घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत  राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे. ते मराठवाड्यात माध्यामांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत.  जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ…  माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही.  उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही.  माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही :  राज ठाकरे

आरक्षणासंदर्भात  माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आरक्षण  द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्यावे… महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही.. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत.. अनेक नोकऱ्या आहेत नोट  वापरले तर पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावात. आर्थिकदृष्ट्या जो मागास आहेत त्याला आरक्षण दिले जाते. जातीवर राजकारण केले जाते. मनोज जरांगेचा माझा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे : राज ठाकरे 

मनोज जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती मणीपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन  हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणीपूर होईल.  शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका.

जरांगेच्या पाठीमागून राजकारण सुरू आहे : राज ठाकरे

फडणवीसांवर राग आहे तर त्यांच्यावर बोला…  समाजात का तेढ निर्माण करत आहेत. मराठा आरक्षण अडवलं कोणी पुढे? 15-20 वर्षे झाली तरी आरक्षण का मिळत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबात शब्द का नाही टाकला? आत्ता जरांगेच्या पाठीमागून राजकारण करत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles