Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘या’ कंपनीने उडवली जीओ, एअरटेलची झोप, आणला सर्वात स्वस्त प्लॅन.! ; महिन्याला ३३३ रुपयांमध्ये मिळवा १३०० GB डेटा ते पण फ्री कॉलिंगसह.

मुंबई : सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे. कंपन्या मोबाईल वापरकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त स्वस्त प्लॅन लाँच करताना दिसत आहेत. कमीत कमी दरामध्ये अधिकाधिक डेटा तसेच फ्री कॉलिंगची सुविधा आणि त्याचबरोबर इतर सुविधा जसं विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सबक्रिप्शन अशा सुविधा या कंपन्यांकडून पुरवल्या जातात. अशा विविध ऑफमुळे या कंपन्यांना ग्राहक मिळवण्यासाठी मदत होतो. 4 G नंतर आता 5G आल्यानंतर तर ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. जीओ, एअरटेल, व्ही आय या कंपन्यांमध्ये सध्या ग्राहकांसाठी चढाओढ असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र या स्पर्धेत आता आणखी एका कंपनीने उडी घेतली आहे, ती म्हणजे बीएसएनएलने (BSNL) बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी असा एक खास प्लॅन आणला आहे, जो तुमच्या देखील पसंतीस उतरेल. अवघ्या 333 रुपयांमध्ये तुम्हाला दर महिन्याला तब्बल 1300GB डेटा मिळणार आहे. तो देखील फ्री कॉलिंग आणि मेसेजच्या सुविधेसह. बीएसएनएलचा हा प्लॅन दिल्ली, मुंबई आणि इतर काही शहर सोडून संपूर्ण देशभरात लागू असणार आहे.बीएसएनएलच्या या प्लॅनचा थेट परिणाम हा आयडिया, एअरटेल, जीओ यासारख्या कंपन्यांवर होऊ शकतो असं मानलं जातं आहे.बीएसएनएलकडून हा प्लॅन सहा महिन्यांच्या टप्प्यात लाँच करण्यात आला आहे, म्हणजे तुम्हाला हा प्लॅन खरेदी करण्यासाठी 1,999 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला सहा महिने दर महिन्याला 1300GB या प्रमाणे डेटा मिळणार आहे, तसेच त्याच्यासोबत मोफत कॉलिक आणि मेसेजची देखील सुविधा मिळणार आहे. या प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे जर तुमचा 1300GB डेटा हा महिना संपण्यापूर्वीच संपला तरी देखील तुमची इंटरनेट सेवा सुरूच राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला 4Mbps नेट युज करता येणार आहे. हा प्लॅन ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे जीओ आणि एअरटेलकडून देखील आपल्या ग्राहकांसाठी काही खास प्लॅन लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटा पुरवण्यात आला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles